Wednesday, 10 May 2017

आडनावाच्या गमती जमती..!
पूर्वी ज्या ठिकाणी आम्ही भाड्याने राहत होतो. त्या बिल्डिंग मध्ये प्रत्येक मजल्यावर एकूण पाच फ्लॅट होते.
एकदा आमच्या शेजारील फ्लॅट मधील कुटुंब कुठेतरी बाहेर गेलं होतं. त्यांच्या घराला लॅच की असणारं कुलूप होतं. त्यामुळे कुलूप लावलं आहे की नाही. ते सुद्धा समजत नव्हतं.. आणि त्या दिवशी नेमकं त्यांच्याकडे कोणी तरी आलं होतं.
त्या दोन व्यक्ती बाहेरून बराच वेळ डोअर बेल वाजवत होते. शेवटी.. आम्ही दरवाजा उघडला आणि त्यांना सांगितलं. घरात कोणी नाहीये, ती लोकं बाहेर गेले आहेत.
त्यावर त्या दोन व्यक्ती आम्हाला म्हणाल्या, ठीक आहे ते आले की त्यांना सांगा " चोरटे " आले होते..!
त्या व्यक्तींचे हे बोल ऐकून माझी बायको आणि मी एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसत होतो. तर त्या दोन व्यक्ती कोणतातरी मोठा गुन्हा केला असल्या सारखे तोंड लपवून गुपचूप निघून गेले होते..!

No comments:

Post a Comment