फायनान्स, प्रकरण ( १ )
~~~~~~~~~~~~~~~
काही बड्या फायनान्स कंपन्या गरजू लोकांना त्यांचे सगळे पुरावे हातात घेऊन हवं तितकं कर्ज देत असतात. आणि, ते पठाणी कर्ज चुकतं करता-करता माणूस अगदी नाकीनऊ येतो.
दहाएक वर्षांपूर्वी, एका फायनान्स कंपनी मधून मी दहा हजार रुपयांचं ते पठाणी कर्ज घेतलं होतं. काय करता.. अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो..!
कर्ज घेतलं होतं, त्यामुळे मी खूप प्रामाणिकपणे त्या कर्जाचे नियमितपणे हफ्ते सुद्धा भरत होतो. कारण कोणीतरी ऐनवेळेला माझ्या मदतीला धावून आलं होतं. हे मी कदापि विसरू शकत नव्हतो.
पण एकदा.. कधीतरी,काहीतरी काही कारणाने माझा एक हफ्ता भरायचा चुकला होता. किंवा तो भरायला मला एक दिवस उशीर झाला होता. पण, मी ते पैसे.. लगेच दुसऱ्या दिवशी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन भरून टाकले होते.
शेवटी.. एकदाचं ते माझं कर्ज प्रकरण मिटलं. पण त्यावेळी, मी एक फार मोठी चूक करून बसलो होतो. आणि हि चूक तुम्ही कोणीही चुकून सुद्धा करू नका..!
त्या कर्ज कंपनीतून, कर्ज पूर्णत्वाचा दाखला मी घेतला नव्हता..!
आणि त्या लोकांनी सुद्धा मला याबाबत काही आगाऊ माहिती सुद्धा दिली नव्हती. हे सगळं काही अगदी ठरवून झालं होतं, यात तिळमात्र शंका नाही. नाहीतर, त्या ऑफिसमध्ये असणाऱ्या कोणीतरी मला काहीतरी हिंट दिली असतीच ना..?
तीन वर्षांपूर्वी.. मी माझ्या राहत्या घरासाठी एलआयसी मध्ये एक कर्जप्रकरण केलं. त्यावेळी, माझी कर्जप्रकरणाची फाईल अंतिम टप्प्यात आली असताना. आणि, मला कर्जाचा चेक मिळणारच होता. त्यावेळी, तेथील अधिकारी मला म्हणाले..
तुमच्या पूर्वीच्या एका कर्ज प्रकरणाची काही रक्कम शिल्लक आहे असं इथे दाखवतंय. पहिलं तुम्ही, त्या फायनान्स कंपनीतून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन या. मग पुढे काय आहे ते आपण पाहूयात..!
माझ्या अंगावर तर कोणतंच कर्ज नव्हतं. तर मग, हा प्रकार कसा काय घडला..?
शेवटी.. न राहून मी त्या एलआयसी मधील अधिकाऱ्याला विचारलं.
साहेब.. माझी किती रक्कम थकलेली दाखवतेय ते जरा पाहता का..! तर, त्यांनी संगणकावर पाहून मला सांगितलं.
तुम्ही त्या कंपनीचे पंचवीस रुपये देणे लागत आहात..!
त्या अधिकार्याचे हे बोल ऐकून.. आता हसावं कि रडावं..? मला तर काहीच समजत नव्हतं.
शेवटी.. नाय हो करता, झक मारत मी त्या फायनान्स कंपनीत गेलो. तर ज्या ठिकाणी मी हे कर्ज प्रकरण केलं होतं, त्या ठिकाणचं त्यांचं ऑफिस कधीच बंद पडलं होतं. किंवा, त्यांनी ते बंद केलं असावं. शेवटी, त्या कंपनीची सगळी इत्यंभूत माहिती काढून. आता, ते ऑफिस कुठे आहे..? त्याची मी शोधाशोध केली. तर, ते ऑफिस नेमकं पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या समोरील बाजूस आहे असं मला समजलं.
मी ताबडतोब त्या ऑफिसमध्ये गेलो, त्यांना माझी सगळी हकीकत समजावून सांगितली. त्यावर, त्यांनी मला माझा कर्ज क्रमांक विचारला. तो तर काही मला माहित नव्हता. शेवटी, त्यांनी माझ्या नावाला सर्च करून सगळी माहिती काढली.
कर्ज प्रकरण संपून, आता जवळपास पाच वर्ष होऊन गेली होती. सगळी माहिती समोर येताच तेथील कर्मचारी मला म्हणाला..!
तुमचे पंचवीस रुपये शिल्लक दाखवत आहे..! कधीतरी तुमचा एखादा हफ्ता उशिरा भरला गेला असावा. असा माझा अंदाज आहे. आणि समोर दाखवतेय हि त्या दंडाची रक्कम असावी..!
त्या मित्राचे हे मधाळ बोल ऐकून, मी पटकन माझ्या खिशातून सुट्टे पंचवीस रुपये बाहेर काढले. आणि, त्या कंपनी कर्मचाऱ्या समोर धरले. तर तो कर्मचारी मला म्हणाला..
अहो थांबा, तुमचा अजून सगळा हिशोब व्हायचा आहे..!
हे ऐकताच, मी ताबडतोब समजून गेलो. आता, हि लोकं मला सोयीस्करपणे घोडा लावणार आहेत. काय करणार, शेवटी मी सुद्धा मुग गिळून गप्प बसलो,
साधारण अर्ध्या तासाने त्यांनी मला आतमध्ये बोलावलं आणि सांगितलं.
तुम्हाला एकूण साडेचार हजार रुपये भरावे लागतील..!
हे ऐकून मी पक्का हैराण झालो. कारण, मला अंधारत ठेऊन त्या पंचवीस रुपयाला चक्रवाढ व्याज लाऊन त्यांनी ती रक्कम इतकी फुगवली होती. मी त्या कर्मचाऱ्याला म्हणालो.. हे खूपच अति होतंय हो. एकतर, सगळे हफ्ते संपताना तुमच्या लोकांनी मला अशी काही माहिती दिली नाही. हि मुळात तुमची चूक आहे. आणि थोडीफार माझी सुद्धा आहे. पण, तो बिचारा काहीएक ऐकण्याच्या तयारीत नव्हता.
त्यांना माहिती होतं, हा पक्का अडलेला आणि नडलेला ग्राहक आहे. आणि, झक मारून त्याला हे पैसे भरावेच लागणार आहेत.
शेवटी.. शिव्याशाप देत मी ते पैसे तिथे भरले.
मी तर.. हकनाक ते पैसे भरले हो, पण यांना सुद्धा घोडा लावणारे लोकं भेटत असतात.
ते कसं..? ते आपण पुढील उद्याच्या भागात पाहू..!
क्रमशः

No comments:
Post a Comment