स्क्विड फिश ( माणक्या ) फ्राय.
सर्रास मत्स्यप्रेमी लोकं त्यांच्या रोजच्या खाण्यात.. सुरमई, पापलेट, हलवा, वांब आणि बांगडा अशी सुटसुटीतपणा आणि खाण्यास सोपे असणाऱ्या माशांना प्रथम पंसती देत असतात.
पण खरं तर, या बोनलेस फिश पेक्षा काटे असणारे मासे चवीला खूप भारी असतात.
उदाहरणार्थ.. बंगाली लोकांची पहिली पसंती असलेला हिल्सा मासा. या माशाच्या किमती सुद्धा अमाप असतात. शिवाय हा ठराविक काळातच मिळत असतो. त्यामुळे याला मागणी सुद्धा प्रचंड असते. या माशात काट्याचं प्रमाण सुद्धा भरपूर असतं. त्याचप्रमाणे, कोकण पट्ट्यात खाल्ला जाणारा करली किंवा टारली नामक माशात सुद्धा खूप काटे असतात. या माशाचा रस्सा बाकी खूपच खुमासदार होतो. तर त्याचप्रमाणे, नदीमधील चालट नावाचा मासा सुद्धा खूप चविष्ट असतो. पण यात सुद्धा खूप काटे हे आलेच.

तर आज आपण ज्या माशाची पाककृती पाहणार आहोत. तो मासा आहे स्क्विड किंवा देशी भाषेत त्याला माणक्या सुद्धा म्हणतात. जेली फिश प्रकारात मोडणारा हा मासा ऑक्टोपसच्या जातकुळीतला आहे. पण त्यापेक्षा आकाराने बराच लहान असणारा हा मासा चवीला सुद्धा खूपच खुमासदार असतो. पुण्या भागात या माशाचे विशेष शौकीन खवय्ये लोकं नसल्याने, या भागात या माशाची आवक सुद्धा फारच थोड्या प्रमाणत होते. किंवा मागणी तसा पुरवठा केला जातो. चला तर मग, आपण या विशिष्ट प्रकारच्या माशाची पाककृती पाहूयात.
सर्वात प्रथम, स्वच्छ आणि ताजे अर्धा किलो स्क्विड मासे घ्या. त्याला आतून आणि बाहेरून स्वच्छ करून घ्या.या माशाच्या पोटामध्ये प्लास्टिक सदृश्य दिसणारा एक मनका असतो. आणि बाहेरील बाजूस असणारी चॉकलेटी रंगाची त्याची पातळ स्कीन सुद्धा अलगद निघणारी असते. हि साफसफाई झाल्यावर, गोलसर पुंगळी असल्यासारखा पांढरा शुभ्र मांसल भाग तुमच्या नजरेस पडेल. या मांसल पुंगळीचे, धारधार सुरीने लहान आकारात त्याच्या गोल गोल रिंग कापून घ्याव्यात. तोंडाकडील भागात असणाऱ्या त्याच्या अतिरिक्त मिशा थोड्या छाटून घ्याव्यात, आणि उरलेला सगळा मांसल भाग त्या मासात समाविष्ट करावा.
कृती :- माणक्याच्या गोल गोल रिंग आणि त्याच्या उर्वरील मांसल भागाला. एका वाडग्यात काढून घ्यावं. आणि त्यात.. हळद, मीठ, लाल तिखट, थोडा गरम मसाला, धने जिरे पावडर आणि लिंबाचा रस घालून त्याला मस्तपैकी एकजीव करून घ्यावं. आणि हे मिश्रण अर्धा तास मुरत ठेवावं.
दुसरीकडे एका भांड्यात दोन अंडी फेटून घ्यावीत. कोर्नफ्लोवर, बेसन पिट आणि तांदळाचं पिट तयार ठेवावं. हे सगळे जिन्नस एकत्र करून घ्यावेत.
कढई मध्ये तेल तापत ठेवावं, आणि मुरत ठेवलेल्या मसालेदार स्क्विड मधील सगळ्या रिंगा आणि त्यांची डोकी, वरील मिश्रानात आपण ज्याप्रकारे कांदा भजी करतो. तसे एकजीव करून घ्यावेत. आणि, एक एक करत त्या सगळ्या रिंग्स आणि मानक्याची डोकी कडकडीत तेलात कुरकुरीत तळून घ्यावेत. खुमासदार आणि खुसखुशीत स्क्विड फिश फ्राय किंवा स्क्विड कोळीवाडा तयार आहे.
( टीप :- पुण्यातील मंडळींना, ताजे आणि विविध व्हरायटीचे मासे हवे असतील. तर त्यांनी, ढोले पाटील रस्त्यावरील श्री. डी.आर. तारू यांच्या फिश मार्केटला नक्की भेट द्या. )
O शेफ O
~PΔΠDIT PΩTTΣR~
~PΔΠDIT PΩTTΣR~
No comments:
Post a Comment