एका अति सज्जन माणसाचा मृत्यू होतो..
आणि, तो मृत्यू लोकात यम दरबारी हजर होतो. चित्रगुप्ताने त्याची कुंडली समोर मांडलेली असते. त्याने पृथ्वीवर केलेल्या कर्माचा न्यायनिवाडा होणार असतो. तो व्यक्ती हात जोडून दरबारात उभा असतो..
चित्रगुप्त म्हणतात.. देवा, या व्यक्तीने त्याच्या संपूर्ण आयुष्यात एकही खोटं काम केलं नाहीये. कोणतंही व्यसन केलं नाहीये. त्यामुळे तुम्ही या व्यक्तीला स्वर्ग प्रदान करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो.
झालं.. तो व्यक्तीही खूप खुश होता. आजवर केलेली पुण्याई त्याच्या कामी आलेली असते.
स्वर्गलोकातील दोन शिपाई, त्याला स्वर्ग भूमीच्या द्वारापर्यंत घेऊन जातात.
झालं.. तो व्यक्तीही खूप खुश होता. आजवर केलेली पुण्याई त्याच्या कामी आलेली असते.
स्वर्गलोकातील दोन शिपाई, त्याला स्वर्ग भूमीच्या द्वारापर्यंत घेऊन जातात.
आणि.. तो व्यक्ती समोर पाहतो तर काय.
एकीकडे स्वर्ग असा फलक लिहिलेला असतो. आणि दुसरीकडे नर्क असा फलक लिहिलेला असतो.
तो व्यक्ती स्वर्गात डोकावून पाहतो.. तर, त्याला त्याचे काही जुने मित्र जे त्याच्या सारखेच सज्जन होते. ती सगळी मंडळी त्याठिकाणी देवाचं भजन करण्यात गर्क झालेले असतात. आणि अचानकपणे त्याचं नरकाच्या दिशेने लक्ष जातं.

आणि पाहतो तर काय..
त्याच्या ओळखीतले काही टारगट डांबरट लोकं मृत्यू पश्चात या नरकात दाखल झालेले असतात. आणि त्याठिकाणी, ते सगळे मित्र एकत्र बसून दारू पीत असतात, कोणी सिगारेट ओढत असतं. तर कोणी तिथे असणाऱ्या ललनेशी लाडिक चाळा करण्यात मश्गुल झालेला असतो.
हे सर्व पाहून तो व्यक्ती विचार करतो..
आपण पृथ्वीवर सुद्धा कसलीच ऐश केली नाहीये. आणि आता इथे स्वर्गात येऊन सुद्धा तेच भजन कीर्तन करण्यात काय हाशील आहे..? त्यापेक्षा देवाला सांगून आपण नरकातच जाऊयात. इथे बघायला सुद्धा कोणी नाहीये, मस्तपैकी जीवाची मजा करून घेऊयात.
असं ठरवून तो व्यक्ती त्या शिपायांना म्हणतो..
मित्रांनो एक काम करा, मला तुम्ही पुन्हा देवाकडे घेऊन चला. मला त्यांना काही सांगायचं आहे.
झालं, ती लोकं त्याला पुन्हा देव दरबारात नेतात, तिथे गेल्यावर हा देवाला विनंती करतो.
झालं, ती लोकं त्याला पुन्हा देव दरबारात नेतात, तिथे गेल्यावर हा देवाला विनंती करतो.
देवा माझी एक इच्छा आहे, मला तुम्ही स्वर्गात न टाकता नरकात टाका..!
देव सुद्धा क्षणभर विचारात पडतात, पण ते त्याची मागणी लगेच मान्य करतात.
आणि ते दोन शिपाई त्याला नरकाच्या आत नेऊन सोडतात.
आणि ते दोन शिपाई त्याला नरकाच्या आत नेऊन सोडतात.
नरकात गेल्याबरोबर, आपण आजवर न केलेल्या सगळ्या गोष्टी आता करता येतील, अशा अतिशय आनंदाने तो धावत सुटतो. आणि त्या बेवड्यांच्या पंगतीत लावण्यवती महिलेशी लाडीक चाळा करायला तिथे जाऊन तो बसणारच, तीतक्यात दुसरे दोन अक्राळविक्राळ शिपाई त्याच्या बखोटीला धरून त्याला उचलतात. आणि त्याला उकळलेल्या तेलाच्या कढईत नेऊन टाकणार असतात.
त्यावर हा सज्जन गृहस्थ त्यांना म्हणतो, का रे बाबांनो माझ्यावर तुम्ही असा जुलम का करताय..? हे समोर असणारं वैभव पाहून मी मुद्दाम देवाकडे नरकाची मागणी केली होती. आणि तुम्ही मला असं छळताय..?
त्यावर हा सज्जन गृहस्थ त्यांना म्हणतो, का रे बाबांनो माझ्यावर तुम्ही असा जुलम का करताय..? हे समोर असणारं वैभव पाहून मी मुद्दाम देवाकडे नरकाची मागणी केली होती. आणि तुम्ही मला असं छळताय..?
त्यावर ते दोन जल्लाद त्या व्यक्तीला म्हणतात..!
अरे वेड्या माणसा.. पृथ्वीवर पुण्यकर्म करणाऱ्या लोकांची प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे नरकात येणाऱ्या लोकांची रीघ कमी झाली आहे.
तर तो व्यक्ती म्हणतो.. मग त्यात माझा काय दोष..? नरकाच्या दरवाजातून आतील लोक किती मौजमजा करत आहेत. हे पाहून मी नरकात यायचं पक्कं केलं. त्यावर ते दोघे जल्लाद जोरजोरात हसतात आणि म्हणतात..
तर तो व्यक्ती म्हणतो.. मग त्यात माझा काय दोष..? नरकाच्या दरवाजातून आतील लोक किती मौजमजा करत आहेत. हे पाहून मी नरकात यायचं पक्कं केलं. त्यावर ते दोघे जल्लाद जोरजोरात हसतात आणि म्हणतात..
अरे.. बाहेरून तू जे सुख पाहिलं होतस ना.. तो तर, आमचा जाहिरात विभाग आहे..!
No comments:
Post a Comment