वीस वर्षांपूर्वी.. पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी,
पुण्याहून टेल्को कंपनीतील नवीन टाटा सुमो गाडी घेऊन, ती नागपूर मधील सदर बाजारात असणाऱ्या, जयका मोटर्स नामक कंपनीत नेऊन सोडायचं काम मी करत होतो. त्यावेळी माझं अगदी हातावरील पोट होतं. नागपुरात जाऊन आलो, तरच माझ्या घरातील चूल पेटायची.

त्यावेळी.. नागपूरचा उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतुंचा मी अगदी जवळून अनुभव घेतला होता. विदर्भात हे तिन्ही ऋतू फारच म्हणजे भयानक कडक असतात. पाऊस असला भयानक पडतो, कि गाडी चालवताना समोरचं काही दिसूच नये. गाडीचे वायपर सुद्धा काम करत नाहीत. हिवाळा सुद्धा इतका भयंकर जाम असतो. कि एक ब्लांकेट अंगावर घेऊन गारठा काही जात नाही. आणि, उन्हाळा तर.. बाबाबाबा अगदी बोलूच नका.
हल्ली पुण्यातील मुली चेहेऱ्याला स्कार्फ बांधून फिरताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु त्यावेळी, तेथील सगळीच लोकं डोक्याला आणि चेहेऱ्याला पांढर्या कपड्याने लपेटून घेऊन फिरताना मी पाहिलं आहे. आणि अजून एक गोष्ट, तिथे इतका भयंकर उन्हाळा असतो, कि त्यामुळे काही महिलांच्या केसांच्या माथ्यावरील अगदी मधोमध असणाऱ्या केसांच्या बटेचा काही भाग, फिक्कट सोनेरी पडलेला दिसायचा. इतकं भयंकर ऊन, कि त्याने केसाचा रंग सुद्धा बदलायचा.
त्यावेळी.. तेथील लोकांनी तोंडाला आणि डोक्याला बांधलेले रुमाल पाहून मला वाटायचं..
काय राव, हि लोकं खूपच अती करत आहेत..!
पण ज्यावेळी, उभ्या आयुष्यात उन्हाळी काय असते, आणि ती कशी लागते, कशामुळे लागते, आणि तिचा त्रास काय होतो..? ते मी, भर उन्हाळ्यात एका नागपुर वारीत जेंव्हा रात्रभर अनुभवलं. तेंव्हापासून, विदर्भातील उन्हाळा म्हंटल कि मी माझ्या कानाला खडा लावत असतो.

त्यावेळी नागपुरात पडणारा उन्हाचा कडाका मला चांगला ध्यानात आहे. अगदी तसाच चटका, यावर्षी पुण्यात पडला आहे. तर मग, आत्ता नागपूरला काय परिस्तिथी असावी..?
वीस वर्षांपूर्वी.. पुण्यात उन्हाळा आला कि सगळी लोकं पंखे खरेदी करायला दुकानात गर्दी करायचे. त्यावेळी उन्हाळ्यात, कुलर किंवा एसी कोणी म्हणावं इतके खरेदी करत नव्हते.
अगदी साध्या पंख्यात काम तमाम होऊन जायचं. त्यावेळी तर, मी अगदी साडेचारशे रुपयात मिळणारा सिंधी, उल्हासनगर ब्रँड पंखा घरी आणून उन्हाळी आनंद साजरा केला आहे.

तर याउलट, त्यावेळी नागपुरात फिरत असताना..
अगदी साध्या पद्धतीने बनवलेले लोखंडी कुलर मला घरोघरी दिसायचे. चारी बाजूने लोखंडी जाळी आणि खालून पोकळ असणारा तो एक मजबूत लोखंडी ढाचा. आणि त्याच्या बाजूला तिन्ही बाजूंनी असणार्या विशिष्ट प्रकारच्या गवताचा पडदा, खरं तर तिथे वाळ्याचा पडदा असायला हवा आहे. पण ते फार महागात जात असल्याने, कदाचित त्यावर हि नवीन उपाययोजना अमलात आणली असावी. तर, त्या लोखंडी ढाच्याच्या आतील बाजूस एक मोठा पंखा, समोरील बाजूस त्याला चालू करण्यासाठी असणारं बटन, पाणी सर्क्युलेषण होण्यासाठी एक छोटासा पंप. आणि खालील बाजूस पाणी ठेवण्यासाठी एक चौकोनी पत्र्याचा ट्रे.
असा अगदी सोप्या रचनेचा हा कुलर त्यावेळी जीवाला फारच गारवा देऊन जायचा. नागपुरातल्या अगदी गरीबातल्या गरीब व्यक्तीच्या घरी सुद्धा मला तो कुलर पाहायला मिळाला आहे.
कारण.. तो कुलर जर घरात नसेल. तर, तिथे माणूस जगूच शकत नाही. इतका भयंकर उन्हाळा त्या भागात असतो.

पण यावर्षी.. आमच्या पुण्यात सुद्धा भयंकर चटका पडला आहे. आत्ता तर मार्च महिना चालू आहे, अजून एप्रिल आणि मे महिना येनं बाकी आहे.
आता आपली परिस्थिती थोडी बऱ्यापैकी आहे. त्यामुळे, मी थंडगार एसी सुद्धा खरेदी करू शकतो.
पण घरी असताना.. रात्रभर एसीत, आणि भर उन्हात दिवसभर, पालिकेच्या धडधडत्या गाडीत उन्हाचे चटके झेलत काम करत राहिलो. तर मी, लवकरात लवकर आजारी पडेल अशी मला दाट शंका आहे.
त्यामुळे.. नामांकित कंपन्यांचे कुलर किंवा एसी घेण्यापेक्षा,
यावर्षी मी.. नागपुरी पद्धतीचे दोन ( डेझर्ट ) कुलर घरी आणले आहेत. एक आमच्या मुलाच्या रूममध्ये आणि एक आम्हा दोघांच्या रूममध्ये.

नागपुरी कुलर दिसायला अगदी साधा आहे, पण त्यामागे माझ्या नागपूर वारीचे बरेच अनुभव, आणि तोच हवाहवासा नैसर्गिक गारवा मला पुन्हा एकदा ताजातवाना करण्यास मदतीला येणार आहेत.
No comments:
Post a Comment