बॉम्बे डक ( ओले बोंबील ) फ्राय..
सुमारे शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी, इंग्रजांच्या राज्यात मुंबईवरून काही प्रकारचे मासे घेऊन एक खास प्रकारची मेल कलकत्त्याला जायची. त्या मेलचं नाव होतं, बॉम्बे डाक. या विशिष्ट प्रकारच्या मेलमधून, ज्या मासळीची ने आन केली जायची. त्याची चव इतकी अप्रतिम होती, कि गोऱ्या साहेबाला सुद्धा या मासळीने चक्क भूरूळ घातली होती. शिवाय.. त्या काळात, या माशाच्या उग्र वासानेच ओळखलं जायचं. कि बॉम्बे डाक मेल आली आहे.
त्याकाळी बॉम्बे डाक हि मेल इतकी प्रसिध्द झाली, कि या मेलमधून येणाऱ्या मासळीलाच " बॉम्बे डाक " या नावाने ओळखलं जाऊ लागलं. आणि ब्रिटीश राज्यात, इंग्रजांनीच या " बॉम्बे डाक " नावाचा अपभ्रंश करून " बॉम्बे डक " असा केला. बॉम्बे डक अर्थात तुमचे आमचे आवडते ओले बोंबील. जगभरातून प्रचंड मागणी असलेला हा मासा, फक्त मुंबई आणि केरळच्या समुद्रातच सापडतो. ओल्या बोंबलाच्या चवीने मुंबई करांना तर अगदी वेडच लावलं आहे. हे वेड इतकं पराकोटीचं आहे, कि क्रिकेटचा देवता सचिन तेंडूलकर सुद्धा या ओल्या बोंबलावर जाम फिदा आहे. बाजारात अगदी सहज उपलब्ध होणारा, आणि त्यामुळेच किमतीच्या मानाने सुद्धा बराच स्वस्त असणारा हा मासा प्रत्येकाच्या जिव्हेचा चाहता झाला.
चला तर मग.. आज आपण ओल्या बोंबलाच्या पाककृतीचा समाचार घेऊयात.
साहित्य :- बोंबील फ्राय बनवण्यासाठी आपल्याला लागतील सात ते आठ लाल तोंडाचे ताजे ओले बोंबील. सात आठ लसून पाकळ्या, तीन ते चार आल्याचे तुकडे, सात आठ काळ्या मिरी, दोन चमचे जिरे, दोन चमचे घाटी मसाला, एक चमचा तांबडं तिखट, हळद, मीठ आणि दोन लिंबाचा रस, तांदळाची पिठी आणि तळण्यासाठी तेल.
कृती :- ताजे बोंबील शक्यतो मासळीच्या दुकानातूनच स्वच्छ करून घ्यावेत. बोंबील शक्यतो लांबसडक असेच घ्यावेत. आणि, एका बोंबलाचे दोन भाग करून घ्यावेत. हे ओले बोंबील वाहत्या पाण्यात ( नळाच्या ) स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यानंतर त्यांना फरशीवर ठेवून त्यावर एक सपाट परात ठेवावी. आणि, त्यावर घरातील दगडी पाट्याचं वजन ठेवावं. किमान, एक तास हे बोंबील पाट्याखाली ठेवावेत. असं केल्याने, बोंबलात असणारं अतिरिक्त पाणी निघून जाईल. आणि, त्यांना तळण्यासाठी तेल सुद्धा कमी लागेल. हॉटेलमध्ये, या गोष्टी कोणी करत बसत नाहीत. कडकडीत तेलात पाणी अठेपर्यंत हे मासे खरपूस तळुन घेतले जातात.
आता आपण वाटण करूयात..
वाटना करिता.. मिक्सरमध्ये आले, लसून, मिरी, जिरे थोडं पाणी घालून वाटून घ्या. हे वाटण बोंबलाला लाऊन घ्या वरून घाटी मसाला, हळद, मीठ टाकून सगळे बोंबील त्या मसाल्यात एकजीव करून घ्या. यानंतर बोंबलावर लिंबू रस आणि तांबडं तिखट घालून पुन्हा एकदा घोळसून घ्या. पाच मिनिटे हे बोंबील मसाल्यात मुरुद्यात. त्यानंतर हे ओले बोंबील तांदळाच्या पिठीत घोळवून घ्या, आणि कडकडीत तेलात डीप फ्राय करून घ्या.
वाटना करिता.. मिक्सरमध्ये आले, लसून, मिरी, जिरे थोडं पाणी घालून वाटून घ्या. हे वाटण बोंबलाला लाऊन घ्या वरून घाटी मसाला, हळद, मीठ टाकून सगळे बोंबील त्या मसाल्यात एकजीव करून घ्या. यानंतर बोंबलावर लिंबू रस आणि तांबडं तिखट घालून पुन्हा एकदा घोळसून घ्या. पाच मिनिटे हे बोंबील मसाल्यात मुरुद्यात. त्यानंतर हे ओले बोंबील तांदळाच्या पिठीत घोळवून घ्या, आणि कडकडीत तेलात डीप फ्राय करून घ्या.
लज्जतदार, स्वादिष्ट तोंडाला चव आणि पाणी आणणारे ओले बोंबील तयार आहेत..!
O शेफ O
~PΔΠDIT PΩTTΣR~
~PΔΠDIT PΩTTΣR~
No comments:
Post a Comment