आम्ही दोघांनी, घरच्यांना न जुमानता पळून जाऊन लग्नं केलं होतं.
आता.. पळून जाऊन, हे पालुपद कोणी लावलं असेल, ते मला माहित नाही. पण आम्ही दोघे पळून वगैरे नाही, तर अगदी चारचाकी गाडीत बसून, कोणालाही न सांगता घरच्यांना हकनाक त्रास देऊन. आम्ही मात्र, अगदी आरामात आमच्या लग्नाला निघून गेलो होतो.

खरं तर, मला या गोष्टी बिलकुल आवडत नाहीत. पण काय आहे, ते नादान वय असतं. आणि त्या वयात आपल्याला चांगलं वाईट सांगणारं सुद्धा कोणी नसतं. त्यामुळे, हे सगळे गोंधळ होत असतात. शिवाय त्यात आपल्या मनाचा फार मोठा रोल असतो.
लग्न करेन तर फक्त हिच्याशीच नाहीतर मी लग्नच करणार नाही..!
वगैरे, वगैरे सारख्या भीष्मप्रतिज्ञा त्यावेळी प्रत्येकाने घेतलेल्या असतात.

परंतु, तुम्हा सर्वांच्या माहितीकरिता म्हणून सांगतो,
मी फार देवभोळा आणि धार्मिक मनुष्य आहे. त्यामुळे, त्या अवघड परिस्थितीत सुद्धा मी तेथील ब्राम्हणाकडून.. साखरपुडा, हळदी समारंभ, सप्तपदी आणि इतर सगळे धार्मिक विधी, सोपस्कार पार पडल्या नंतरच मंगलाष्टकाच्या गजरात आम्ही लग्नं केलं.

आजवर, बरेच जणांनी मला माझ्या लग्नाची हकीकत विचारली. किंवा त्यावर काहीतरी लिहा म्हणून गळ घातली. परंतु, त्यावर मी कधीही लिहिलं नव्हतं.
ते काहीही असो..पण माझ्या माहितीप्रमाणे, आम्ही दोघांनी केलेला तो एक निव्वळ मूर्खपणा होता.
आयुष्यात.. जन्म, लग्न आणि मृत्यू एकदाच होतो. आता अनेक ( दोन, चार ) लग्नं करणारी मंडळी सुद्धा असतील. पण हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे.

आज, माझा अगदी सुखी संसार आहे, आम्हा दोघात कोणताच बेबनाव नाही. आम्ही तिघेही आपापले जन्मदिवस मित्र मैत्रिणींच्या गराड्यात अगदी धूमधडाक्यात साजरे करत असतो. एकंदरीत आम्ही खूप मजेत आहोत. तरी सुद्धा, माझं मन मला कुठेतरी खात असतं.
त्यामुळे, आम्ही आमचा लग्नदिवस कधी साजराच करत नाही..!
नाही हो, लग्न हे अगदी धुमधडाक्यात, नातेवाईकांच्या, मित्रमंडळीच्या आणि देवा, ब्राम्हणांच्या साक्षीनेच व्हायला हवं. खरं तर, त्यावेळी मला आवड असून सुद्धा हे सगळं काही जमलं नाही.
कारण, आमच्या दोघांच्या घरचे लोकं या लग्नाला संमती देणार नाहीत. हे मला माहिती होतं. म्हणून, मला हा नको तो उपद्व्याप करावा लागला. त्याला कारण एकच, मी शब्द दिल्यावर कोणाला फसवत नाही. तर मग, माझ्यासाठी जीव द्यायला तयार असणाऱ्या प्रेयसीला मी फसवू शकलो असतो का..?

तेंव्हापासून एकच गोष्ट मी ध्यानात ठेवली आहे. आपण हे चुकीचं काम केलं आहे, पण आपल्या एकुलत्या एक मुलाने तसं पाऊल उचलू नये. त्याकरिता त्याला समज आल्यापासून मी सांगत आलो आहे. प्रेमप्रकरणं वगैरेपासून जरा दूर राहात जा. आणि जर का ठराविक वयात तुझं कुठे सुत जमणार असेल. तर अगदी ठरवून एखाद्या डॉक्टर किंवा इंजिनियर मुलीशी प्रेम कर. नाहीतर, मी तुझ्यासाठी एक नंबर मुलगी पाहून देईल. कारण, आमच्या समाजात माझ्या मुलाला बऱ्याच लोकांची पसंती आहे. पण तुझं लग्न बाकी, अगदी घोडीवर बसून आणि धुमधडाक्यातच ( म्हणजे खर्चिक नाही, तर वाजत गाजत ) झालं पाहिजे.
काही लोकांना हि फार मोठी अतिशयोक्ती वाटेल, पण हि आजच्या काळाची आणि माझ्या अपूर्ण इच्छेच्या आवडीची गरज आहे.

येथील सर्व तरुण मुलांना / मित्रांना मी एक गोष्ट इथे सांगू इच्छितो..
प्रत्येक गोष्ट हि ज्या त्या वयातच झाली पाहिजे. आता तुमचं शिकायचं वय आहे, तर पहिलं शिक्षणाला प्राधान्य द्या. त्यानंतर. इतर सगळ्या गोष्टी करायला तुमच्याकडे बराच वेळ पडला आहे. त्याचबरोबर.. प्रेम हे काही सांगून होत नाही.
त्यामुळे, प्रेम करताना सुद्धा काही गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. पूर्वी सर्कशीतून काही विदुषी आपल्याला एका चाकाची सायकल चालवताना दिसायचे. आता तीच जागा दोनचाकी बुलेटने घेतली आहे. आजच्या जमान्यात, संसाराची सुद्धा दोन्ही चाकं फिरती असलीच पाहिजे. एकट्या दुकट्याने मुळीच संसार होत नसतात. अजून एक महत्वाची गोष्ट, देखणी बायको नेहेमी दुसऱ्याची असते. त्यामुळे, मुलींचं रुपरंग पाहण्यापेक्षा तिच्यावर झालेले संस्कार आणि तिचं शिक्षण पाहणं नक्कीच फायदेशीर ठरेल. कारण आजकाल सगळ्या मुली सुंदरच दिसत असतात. पण सोबतच ती मुलगी कमावती असेल तर अगदी सोनेपे सुहागा होईल.

खरं सांगायला गेलं तर, बायको कितीही सुंदर असली. तरी, बेडरूममध्ये रात्रीच्या अंधारात आपल्याला तिचं सौंदर्य दिसत नसतं. आणि, सौंदर्य हि काही अनंतकाळ टिकणारी गोष्ट नाहीये. हा फार मोठा, महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे.
त्यावेळी प्रेमविवाह करून.. कर्म, धर्म, संयोगाने आमची संसाररूपी नैय्या अगदी व्यवस्थितपणे किनारी लागली. पण चुकुनही, तुम्हा कोणावर असं पळून जाऊन लग्न करायची पाळी येऊ नये. तुम्हा सर्वांची लग्नं खूप धुमधडाक्यात होवोत. हेच मी, परमेश्वर चरणी शुभचिंतन करतो.
No comments:
Post a Comment