Wednesday, 10 May 2017

कॉंग्रेस नावाचं गाजरगवत, पिंपरी-चिंचवड मधून समूळ नष्ट झालं आहे..!
पूर्वी.. जिकडे पहावं तिकडं मोकळ्या प्लॉटवर आणि जागा मिळेल तिकडे फक्त यांच गवताचं राज्य होतं. सगळा एरियाच त्याने काबीज केला होता म्हणा ना. पण, जसजसं शहरीकरण होत गेलं. तशी, लोकांची लोकवस्ती सुद्धा वाढत गेली. उद्योगनगरी बहरू फुलू लागली. आणि, बघता-बघता होत्याचं नव्हतं झालं.
हळूहळू कमी होत गेलेलं हे गाजरगवत.. आज, पिंपरी-चिंचवड मधून समूळ नष्ट झालं. 
कोणे एकेकाळी, आपल्या भारतात दुष्काळ पडला होता,
त्यावेळी.. विदेशातून अन्नाची मदत म्हणून आलेल्या गव्हाच्या पोत्यात. या गवताच्या बिया आढळून आल्या होत्या. असं माझ्या ऐकिवात आहे. आणि त्यावेळी, त्या गव्हाबरोबर आलेली हि कोंग्रेसी गवताची घाण. हाहा म्हणता.. संपूर्ण भारतभर पसरली. त्याकाळी, या कॉंग्रेसमुळे भारतीय शेतकरी खरा हवालदिल झाला होता. पण तरीही ते शेतकाम करत होते.
आम्ही लहान असताना, जिकडे पहावं तिकडे हेच गवत आम्हाला फोफावलेलं दिसत असायचं. त्यावेळी, हे गाजरगवत इतकं फोफावलं होतं. कि त्याच्या फुलोऱ्यात, आम्ही चक्क लपाछपी सुद्धा खेळायचो.
पण काळाच्या ओघात, ते गवत आता समूळ नष्ट झालं आहे. त्या गोष्टीचं, मला बिलकुल वाईट वाटत नाही. उलट, जे झालं ते बरंच झालं..
सबंध देशाची, आणि.. शेतीची वाट लावणाऱ्या, त्या कॉंग्रेस गवताची.
शेवट.. आमच्या पिंपवड मधून अखेर तर झाली..! पुन्हा कधीही दुष्काळ पडू नये, आणि या विदेशी गवताने पुन्हा एकदा घुसखोरी करू नये. बस, बाकी दुसरी काहीच इच्छा नाही. त्याचबरोबर, जमलं तर, त्या आमच्या नदीतील.. विदेशातून आलेल्या हिरव्या जलपर्णीचा सुद्धा लवकरात लवकर नायनाट व्हावा..!
( टीप :- ओन्ली गाजरगवत, नो अनादर इशुस प्लीज. :) )


No comments:

Post a Comment