मरणोत्तर देहदान..
खरं तर, मृत्यूनंतर येणारा देहदान हा ऐच्छिक विषय जरी असला. तरी सुद्धा, हा खूपच किचकट विषय आहे. आणि.. हा विषय जितका चांगला, तितकाच वाईट सुद्धा आहे. खरं तर, या गोष्टीला काही ठोस पर्याय सुद्धा नाहीये. कारण, हि त्या मर्तकाची अंतिम इच्छा असते. आणि ती, नाईलाजाने का होईना पण प्रत्येकाला पूर्ण करावीच लागते. नाहीतर, पुन्हा एकदा पाप पुण्याच्या गोष्टी आपल्यासमोर ठाण मांडून बसतात. ते हि, अगदी मरेपर्यंत.
कारण, मी स्वतः माझ्या मृत्यूनंतर माझ्या अवयव दानाचे फॉर्म भरून दिले आहेत.
परंतु.. देहदान हा विषय माझ्या कधी पचनीच पडला नाही. आणि पडणार सुद्धा नाही. काही रूढी, परंपरागत विषय अगदी जवळून पाहिल्यामुळे, माझ्यामध्ये असा बदल घडला असेल. तर ते, मला सांगता येणार नाही.

ज्या व्यक्तींनी.. काशीला जाऊन जिवंतपणी आपला पिंडदान केला असेल. तशा लोकांनी, असं साहस केलं तर मला त्याचं काहीएक वाटणार नाही.
किंवा, एखाद्या व्यक्तीची सर्व मुलं विदेशात स्थायिक झाले आहेत. आणि, त्यांची परत येण्याची सुतराम सुद्धा शक्यता नाही. त्यांना सुद्धा या विषयात आपला ग्रीन सिग्नल आहे.
किंवा, एखाद्या व्यक्तीला मुलबाळच नाहीत. त्यामुळे, माझे अंत्यसंस्कार योग्य रीतीने पार पाडले जातील कि नाही..?
मनामध्ये अशी शंका असणाऱ्या लोकांनी हे पाऊल उचललं. तर, मला त्यात कोणतंही नवल वाटणार नाही.

कारण.. देहदान करणारा व्यक्ती, हा त्याच्या मर्जीप्रमाणे देहदान करून मोकळा झालेला असतो.
त्यावेळी, त्याच्या मनामध्ये नेमका कोणता विचार चालू असतो..? किंवा, हे कर्म करण्यामागे त्याचा नेमका काय हेतू असतो..? हे कोणीच ताडू शकत नसतं.

पण त्यानंतर.. त्याच्या वारसांना, समाजातील लोकांच्या नको त्या प्रश्नांना सामोरं जाणं भाग पडत असतं. हे त्याच्या गावी सुद्धा नसत. कारण..
" सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग..? "
आपण लोकं, नेहेमी समाजाला घाबरत असतो. कारण.. आपल्या मनावर लहानपणापासून तसा एक विशिष्ट प्रकारचा सामाजिक पगडा निर्माण झालेला असतो.
जो व्यक्ती, मानुसघाना आहे किंवा समाजप्रिय नाहीये, किंवा समाजात वावरत नाहीये. अशा लोकांना, या गोष्टींचं काहीएक सोयरसुतक वाटत नसतं. पण, समाजात वावरणाऱ्या लोकांना याची भलतीच भारी किंमत मोजावी लागत असते.
कारण.. असा निर्णय घेतल्यानंतर, प्रत्यक्ष देहदानाचा निर्णय घेणाऱ्या व्यक्तीला कोणी जाब विचारात नसतं. पण, त्याच्या वारसांना जरी तोंडावर कोणी जाब जरी विचारला नाही.
तरी.. भल्या, बुऱ्याची कोणतीच माहिती नसणाऱ्या व्यक्ती. आतल्याआत त्याच्या वारसांना टोमणे मारायचं कमी करत नसतात. हि अगदी काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे. अशा वेळी.. आपण बोलणाराचं तोंड धरू शकत नसतो. अशावेळी, आपल्याला समाजातील लोकांचा फक्त शाब्दिक माराच सहन करावा लागत असतो.

माझ्या माहितीप्रमाणे.. असे महाभयंकर निर्णय घेण्याअगोदर, प्रत्येक व्यक्तीने आपल्या नातेवाईकांना आणि हितचिंतकांना विश्वासात घेऊन हे पाऊल उचललं पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. त्यांची संमती असेल तरच, किंवा त्यांना शंभर टक्के विश्वासात घेऊनच असं धाडशी पाऊल उचलनं कधीही हितकारक ठरू शकतं.
शेवटी काय आहे, माणूस मेल्यावर त्यात हाडा मासाशिवाय दुसरं काहीच उरत नाही. उरतात त्या फक्त.. आपल्या बोथट भावना, आणि दीर्घ आठवणी. पण तरी सुद्धा, त्या निश्चल देहामध्ये आपला जीव गुंतलेला असतोच. हे मात्र सर्वाना कबुल असावं. ज्यावेळी, आपण आपल्या हाताने त्या मृत व्यक्तीचे अंतिम क्रियाकर्म पार पाडत असतो. त्यावेळी, नकळतपणे आपण सुद्धा एका समाजिक जबादारीतून किंवा धार्मिक बंधनातून मुक्त झाल्याची आपल्याला अनुभूती मिळत असते.

काही व्यक्ती, मरणोत्तर देहदान करत असतात..
नवशिक्या डॉक्टर मित्रांना त्या मृत शरीराचा शिक्षणासाठी नक्कीच फायदा होत असेल. पण शेवटी तो दिवस सुद्धा येतोच, ज्यावेळी ते मृत शरीर अभ्यासाच्या कामाचं सुद्धा उरत नाही. त्यावेळी, त्या शरीराला अग्निडाग देण्यासाठी आणलं जातं. पण त्यावेळी ते अखंड शरीर मुळीच राहिलेलं नसतं. शरीराचा ठराविक भाग टाकाऊ झाल्यानंतर, एखाद्या मांजरपाट कपड्याच्या पोत्यात भरून त्यांना स्मशानात आणलं जातं. त्यावेळी, तिथे एकतर सगळे हातच असतात. तर कधी, पायच असतात. तर कधी शीर नसलेलं धड असतं. तर कधी काय, तर कधी काय असतं..!

हे सगळं, मी माझ्या डोळ्याने पाहिलं आहे. आणि खरं तर पाहिलं म्हणण्या पेक्षा मला ते मुळीच पहावलं गेलं नव्हतं. असं म्हंटल तर ते जास्त योग्य ठरेल. त्यावेळी, आपल्या समोर तर ते एक मेलेल्या शरीराचे विविध सुटे अवयव असतात. पण, आपल्या आंतरिक मनात मात्र विचारांची भलतीच कालवाकालव सुरु झालेली असते.
कोण असेल, कोणाचं असेल, बाई असेल कि बाप्या असेल..? आणि त्यावेळी, आपल्या मनाला आपण सुद्धा खरं उत्तर देऊ शकत नाही. या सर्व गोष्टींसमोर आपण सुद्धा अगदी हतबल झालेलो असतो. आणि शेवटी, आपल्या मुखातून सुद्धा एक वाक्य बाहेर पडतच..

जाऊदे.. एकदिवस मला सुद्धा याच मार्गाने आणि इथेच यायचं आहे..!
आपल्याला कोणत्या प्रकारे मरण येईल, ते आपण सांगू शकत नाही. किंवा, आपल्या देहावर अंतिम क्रियाकर्म होतील कि नाही. याची सुद्धा आपल्याला काहीच माहिती किंवा शाश्वती नसते. कारण, मृत्यूनंतर काय होणार आहे..? हे कोणालाच ठाऊक नसतं. तरी सुद्धा, प्रत्येकाच्या मुखात तुकोबांनी लिहिलेल्या या दोन ओळी हमखास येत असतात.
याचीसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिन गोड व्हावा..!
शेवटी.. आपला शेवट कसा व्हावा, किंवा आपली अंतिम इच्छा काय आहे..? हे, आपल्या हातात मुळीच नसतं. ते सगळं काही त्या कर्त्या करवीत्याच्या हातातच असतं..!
( टीप :- माझ्या मताशी सगळेच मित्र सहमत असतीलच असं सांगता येत नाही. शेवटी प्रत्येकाला, आपआपल्या इच्छेप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. )
O जय श्री राम. O
No comments:
Post a Comment