Wednesday, 10 May 2017

उन्हाळ्यात.. अंगात पांढरा कपडा घातल्यावर. म्हणावा असा चटका बसत नाही. पण त्याच ठिकाणी, काळा कपडा घातल्यावर भयंकर चटका बसतो. त्यामुळे, उन्हाळ्यात शक्यतो कोणीही काळी वस्त्र परिधान करत नाहीत.
पण अजून एका गोष्टीचं गणित मला सुटत नाहीये, ते म्हणजे..
काही व्यक्तींच्या डोक्यावर काळी केसं असतात, तर काही लोकांच्या डोक्यावर पांढरी केसं असतात. तर काहीजण माझ्यासारखे टक्कलग्रस्थ सुद्धा असतात.
तर.. डोक्यावर काळी केसं असणाऱ्या लोकांना उन्हाचा जास्ती चटका बसत असावा का..?
किंवा, पांढरी केसं असणाऱ्या लोकांना उन्हाचा कमी चटका बसत असावा का..?
कारण काय आहे..
मला टक्कल पडून आता बरीच वर्ष लोटली आहेत. आणि माझ्या डोक्यावर केसं होती त्यावेळी, पुण्यात म्हणावा असा चटका सुद्धा पडत नव्हता. त्यामुळे, जुनं असं काही आठवत नाहीये. आणि, आता डोक्यावर केसं नसल्याने. मी काही त्याची पडताळणी सुद्धा करू शकत नाहीये.
काळ्या, पांढऱ्या केसावाल्या लोकांनी आवर्जून उत्तरं द्या बरं का..!

No comments:

Post a Comment